A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
यतिमन मम मानित त्या

यतिमन मम मानित त्या
एकल्या नृपाला
आदिअंत ज्यास नसे
त्या सनातनाला

गगनधरा ज्या निवास
बंधन भय नाहि त्यास
समिर करिल काय नमन
सघन सागराला