बोल सख्या मधु बोल
बोल सख्या मधु बोल रे,
धरू नको अबोला
तव मुरलीचा बोल घुमला
विमल हृदयि बघ खोल रे
बावरि राधा, विकल मनाचा-
सावरि सुटला तोल रे
वाजिव सखया, एकदा बासरी
घेइ जिवाचे मोल रे
विश्व उमलले, जीवन फुलले
फुले जादू अनमोल रे
हासति अनंत नभांतरि तारे
नाचति किती ग्रहगोल रे
जिवलगा कन्हैया,
बोल गडे, मधु बोल रे
धरू नको अबोला
तव मुरलीचा बोल घुमला
विमल हृदयि बघ खोल रे
बावरि राधा, विकल मनाचा-
सावरि सुटला तोल रे
वाजिव सखया, एकदा बासरी
घेइ जिवाचे मोल रे
विश्व उमलले, जीवन फुलले
फुले जादू अनमोल रे
हासति अनंत नभांतरि तारे
नाचति किती ग्रहगोल रे
जिवलगा कन्हैया,
बोल गडे, मधु बोल रे
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | |
स्वर | - | संजीवनी मराठे |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर |
विकल | - | विव्हल. |
साच | - | खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.