काही निवडक अभिप्राय
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साजेसं गाणं मला आपल्या वेबसाईटवर मिळते आणि नव्याने एक दृष्टिकोन देऊन जाते.- प्रणव पाटील
अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात्
O Goddess Saraswati, your this treasure is unique in nature. It increases when it is spent and is reduced, if it is hoarded and not shared with others.
अतिशय उत्कृष्ठ व दर्जेदार.- डॉ. अनिल कारवानकर
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात्
O Goddess Saraswati, your this treasure is unique in nature. It increases when it is spent and is reduced, if it is hoarded and not shared with others.
अतिशय उत्कृष्ठ व दर्जेदार.- डॉ. अनिल कारवानकर
'आठवणीतली गाणी' ही website नाही insight आहे.- निनाद वसंत आजगांवकर
मला तर फेसबुकपेक्षाही 'आठवणीतील गाणी'वर वेळ घालवायला आवडते.- कीर्ती कल्याणकर
I salute you. While in Africa on military duty I am really enjoying Aathavanitli Gani. In this pandemic period it has become my best friend. Your public service initiative is outstanding. Jai Hind Jai Maharashtra.- Sandip Subhash Thorat
मी जेंव्हा जेंव्हा माननीय भीमसेन जोशी यांनी गायलेला तुकाराम महाराजांचा अभंग 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले' ऐकायचो, तेंव्हा त्यातील 'ज्यासी अपंगिता नाही त्यासी म्हणे जो आपुले ….' या ओळीशी अडखळायचो. त्यातील अर्थाचा संदर्भ लागत नव्हता. जो अपंग नाही त्याला आपुले म्हणण्यात कुठे आला साधूपणा, हे समजत नव्हते. बर्याच मान्यवर आणि जाणकार व्यक्तींशी चर्चा करूनही समाधानकारक खुलासा होत नव्हता. शेवटी तुमच्या साईटवर आलो. या अभंगावर क्लिक केले आणि तेथे तो अभंग संपूर्ण वाचता आला आणि त्वरित खुलासा झाला.- संजय थिगळे
वैशाख वणवा पेटलेला असतांना, एक वळवाच्या पावसाची सर सुद्धा मनाला शांत करून येणार्या आषाढ सरींची आस लावून जाते, तसाच आनंद कामाच्या ओझ्याने वैतागलेले असतांना आपल्या वेबसाइट वर चटकन एखाद्या गाण्याला क्लिक करून ऐकण्याने मिळतो आणि परत घरी जाऊन निवांतपणे रात्री या संकेतस्थळावर मनमुराद भ्रमंती करायची आहे, या आशेने कामाला परत हुरुप येतो.- अमोल रविंद्र देव
मराठमोळ्या गाण्यांचा सगळ्यांना खुला आणि सुबद्ध संग्रह असावा, असं मला नेहमीच वाटत आलं. खरं तर असा online संग्रह आपणच तयार करावा, अशी इच्छा होती. त्याच दरम्यान ’आठवणीतली गाणी’ दिसली. गाण्यांचा संग्रह करण्याचा विचार लगेच दूर पळाला ! कुठेतरी वाईट पण वाटलं. वाईट एवढ्याच करता वाटलं की आपला ह्यात काहीच वाटा नाही.
आता जेव्हा 'आठवणीतली गाणी' बघते तेव्हा माझ्या वाईट वाटण्यावर हसू येतं ! मी विचार केला होता त्याच्या कितीतरी पलीकडे आहे 'आठवणीतली गाणी'चा विस्तार ! गाण्यांची सुबद्ध वर्गवारी, संतवाणी, गीतरामायण, playlist तयार न करता येण्यावर दिलेला भर - तो का दिलाय त्याचं उत्तम स्पष्टीकरण - आणि कठीण शब्दांचे अर्थ - सगळंच अप्रतिम!- प्रीती जोशी
आता जेव्हा 'आठवणीतली गाणी' बघते तेव्हा माझ्या वाईट वाटण्यावर हसू येतं ! मी विचार केला होता त्याच्या कितीतरी पलीकडे आहे 'आठवणीतली गाणी'चा विस्तार ! गाण्यांची सुबद्ध वर्गवारी, संतवाणी, गीतरामायण, playlist तयार न करता येण्यावर दिलेला भर - तो का दिलाय त्याचं उत्तम स्पष्टीकरण - आणि कठीण शब्दांचे अर्थ - सगळंच अप्रतिम!- प्रीती जोशी
आपला छंद सर्वांच्या उपयोगी पडावा ही इच्छा अफलातूनच. पण त्या छंदाचे योजन ह्या प्रमाणावर !! आपल्या उद्योजकतेचे व उद्यमशीलतेचे अप्रतीम उदाहरण आहे हे संस्थळ. हम तो झुक कर सलाम करते हैं ।- प्रकाश पटवर्धन
मी आपल्या वेबसाईटचा पुरेपूर वापर करतो. गाण्यांसोबत गाण्यांचे शब्द असल्यामुळे गाणे पाठ होते. परिस्थितीनुसार मला गुणगुणायला आवडते. मित्रांवर चांगलीच छाप पढते, त्यामुळे मी मित्रांमध्ये बराच फेमस आहे. ही किमया तुमच्या वेबसाईटमुळे माझ्या जीवनात घडत आहे. त्यामुळे तुमचे आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद,..- जयंत ताटी
I am not a Marathi speaker; I enjoy devotional Marathi songs. I am very fond of the songs from the movie Dharmatma (1935). Thank you for adding two songs from this movie on Aathavantili Gani recently.- Dulal Borthakur
Myself (90 years) and my wife Susheela( 86 yrs) are Aathavanitli Gani fans. Every evening we used to enjoy music for a couple of hours on the website. It was a simple proceedure to click and activate songs. Since last few days method of clicking has changed and we do not know how to activate. Will you kindly enllighten and oblige old people? Please call me if you can. My phone number is ***- B H Mhatre
(This qerry was addressed and resolved over the phone. - Alka Vibhas)
I feel awkward to say I did not know of this site for 9 years !
I think this work needs to be publicised and appreciated far more. I will contribute by sending out mails, just as Achyut Godbole did for me !- Ashutosh Joshi
I think this work needs to be publicised and appreciated far more. I will contribute by sending out mails, just as Achyut Godbole did for me !- Ashutosh Joshi
या संकेतस्थळाची माहिती मला ते सुरू झाल्यानंतरच्या काही दिवसातच मिळाली. स्पष्टच सांगायचे तर हे काही फार काळ टिकेल, असे मला वाटले नव्हते. पण तुम्ही फारच चिकाटीच्या निघालात.- सदानंद पाटील
आज पर्यंत इंटरनेटवरती शोध सुरू असायचा काहीतरी दिव्य सापडेल. आज तो शोध संपला आहे. हेच जे मला हवे होते. आता आठवणीतील गाणी हेच माझे होम पेज होणार, हे ठरले.- गिरीश लिमये
आठवणीतील गाणी सर्वानाच आवडतात, गुणगुणाविशीही वाटतात. पण अनेकांना मुखड्याचे शब्दही धड आठवत नाहीत. तर अनेक जण आपल्या मनातले शब्द बेलाशक गाण्यात घुसवून गात असतात. तुमच्या संकेतस्थळाने ही मोठी अडचण दूर केली आहे. एका भजनाचे शब्द 'काळ आला देहासि नेउ' असेच आहेत, अशी पैज माझा एक मित्र घेत होता. योग्य शब्दांसाठी त्याला हे संकेतस्थळ पहाण्यास सांगितले. त्यालाही ते फार आवडले.- अरविंद खनोलकर
I am an IPS officer serving in Bangalore, Karnataka for last 13 years. It is a great pleasure to visit your site and it has become a daily ritual to visit the site and listen to the glory of marathi songs.- Hemant Nimbalkar
काल रात्री आठवणीतली गाणीची साईट पहात, खरं म्हणजे अनुभवत होतो. काय काम केलंयस तू..अत्यंत स्वच्छ, सुस्पष्ट (conceptually and practially) आणि मराठी भावगीताच्या स्वरभाव-धर्माला (गंमत पाहिलीस, मी स्वभाव लिहीत होतो..चुकून स्वरभाव टाईप झालं..पण किती समर्पक ना !) असं थेट आणि साधं .. तुला सांगायला नको, पण साधेपणा किंवा सोपेपणा ही अत्यंत कठीण आणि दुर्लभ गोष्ट असते. कारण साधं म्हणजे सामान्य नव्हे..(simplicity does not mean ordinary) आणि हे एकहाती.. (तुझ्या मते अनेकांची मदत असली तरीही) करणं ही छोटी गोष्ट नाही.- सुधीर मोघे
आठवणीत असलेल्या पण आठवत नसलेल्या मराठी गाण्यांना उजाळा देणारे एकमेव संकेत-स्थळ म्हणजे आठवणीतली गाणी. या अवीट मराठीची गोडी सगळ्या मराठी मनांसाठी विनामुल्य उपलब्ध केल्याबद्दल तुझे नुसते मन:पूर्वकच काय पण अगदी नेत्र-कर्णपूर्वक आभार.- सुधीर ओक
मराठी गाणी ती देखील इतकी सारी???? मला तर बघुन वेडच लागायचे बाकी राहिले. मला आपण कशा आहात, कशा दिसता अथवा आपले वय माहीत नाही. पण खूप आपल्याशा वाटता.- मधुरिका चौधरी
समर्थ रामदास यांची दासबोधातील कवणे मिळतील म्हणून गूगलवर शोध घेता घेता ही साईट मिळाली. अतिशय आनंद झाला. पाहिजे ते नाही मिळाले पण वाळवंटात हिरवळ मिळाली तर जो आनंद होतो, तसा आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद.- अरुणकुमार बिराजदार
प्रिय - आपण कोणी का असेनात ! आपल्या आठवणीतील गाण्यांना मी माझ्यापुरते नाव ठेवतो 'कनवटिची गाणी'. ही मराठी गाणी म्हणजे एक समृद्ध ठेवा आहे, कनवटीला खोचलेला. सलाम !! वन्दे मातरम् !!!- विनायक कर्णिक
संपूर्ण श्रेयनामावलीसह दुर्मिळ गाणी व ऐकण्याचीही सुविधा यामुळे चहाबरोबर बिस्किटं दिल्यानंतर 'सामना' मधल्या मास्तरांची जी अवस्था झाली, तशीच काहीशी माझीही झाली. अपेक्षांची परिपूर्णता याचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे आपले संकेतस्थळ.- श्रीकांत माळी
सभ्य आणि सजग माणसाचे अनेकोत्तम संकेत सांभाळून हे संकेतस्थळ साकारले गेले आहे. ऋणी आहोत.- कृत्तिका बापट
You have done a great service to Marathi culture and Marathi music and creatively used the new medium to make it immortal! Really, really a great achievement.
I had almost forgotten the poems and lyrics that I had written almost 50 years ago, and to hear them come alive in Aathavanitli Gani was a thrill of a lifetime! Thank you!- Jayant Marathe, Rochester, NY, USA.
I had almost forgotten the poems and lyrics that I had written almost 50 years ago, and to hear them come alive in Aathavanitli Gani was a thrill of a lifetime! Thank you!- Jayant Marathe, Rochester, NY, USA.
We are RecAlz, a social startup supported by TCS Foundation at Nashik. We are trying to help improve the lives of people affected with dementia, Alzheimer's and their caregivers.
Our team is trying to use music to evoke positive feelings in people suffering from this condition. Old music which can take them back to their childhood days can have amazing effects on these people and our attempt is to make this solution accessible to all.
We are really appreciative of the amazing work that you have done to revive Marathi culture. For our work, we request your help to tap into our rich culture to achieve some social good. Together, we hope that we can make a social impact.- Team RecAlz
Our team is trying to use music to evoke positive feelings in people suffering from this condition. Old music which can take them back to their childhood days can have amazing effects on these people and our attempt is to make this solution accessible to all.
We are really appreciative of the amazing work that you have done to revive Marathi culture. For our work, we request your help to tap into our rich culture to achieve some social good. Together, we hope that we can make a social impact.- Team RecAlz
अलका, तुझ्या 'आठवणीतील गाणी' ह्या वेबसाईट वरून 'गोविंदा रे गोपाळा' या श्री. सुरेश हळदणकर यांनी गायलेल्या गाण्याचे शब्द मी घेतले. मला या गाण्याचे इंग्रजीत भाषांतर देशील का? माझ्या एका काश्मिरी मित्राला हे गाणे खूप भावले. हे गाणे तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवू इच्छित आहे.- पतंजली मादुस्कर
Namaskar, My name is Sara and I am an Italian scholar. I am searching the lyrics of girnichi laavni of Narayan Surve. I think that your website is very interesting and I would truly appreciate if you might help me. Thank you very much for your work. Best regards,- Sara Roncaglia
मला जन्मल्यापासून दिसत नाही पण मी गातो. भारताबाहेर रहातो. गाणं शिकवणे हा माझा व्यवसाय आहे. दिसत नसल्याने मला वेबसाईटचा सौदर्यानुभव घेता येते नाही, उपयोग मात्र मी पुरेपूर करतो.- सुरेश
मी काय सांगू ? मी २२ वर्षांची असताना माझ्या दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता गेली. मी hearing handicapped आहे. पण 'आठवणीतली गाण'मुळे मला खूप गाणी वाचता व गुणगुणता आली.- शोभा थोरावडे वाघमारे