A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
यमुनाकाठीं ताजमहाल

बादशहाच्या अमर प्रीतिचे मंदिर एक विशाल
यमुनाकाठीं ताजमहाल

मूर्तिमंत झोपली प्रीत अन्‌ मृत्यूचे ओढून पांघरूण
जीवन कसले महाकाव्य ते गाइल जग चिरकाल
यमुनाकाठीं ताजमहाल

नि:शब्द शांती अवतीभवती, हिरे जडविले थडग्यावरती
एकच पणती पावित्र्याची जळते येथ खुशाल
यमुनाकाठीं ताजमहाल

हळूच या रसिकांनो येथे, नका वाजवू पाऊलांते
दिव्यदृष्टिला होइल तुमच्या मंगल साक्षात्कार
यमुनाकाठीं ताजमहाल