अजिंक्य भारत अजिंक्य जनता
अजिंक्य भारत अजिंक्य जनता
ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
मातीमधल्या कणाकणातुन
स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले
संघटनेचा मंत्र जपा रे
भाग्यवान ते जवान सगळे
हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले
मान राखला मातृभूमीचा रे
इतिहासाच्या पानोपानी
बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून
पराक्रमाचे गीत गाउया रे
ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
मातीमधल्या कणाकणातुन
स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले
संघटनेचा मंत्र जपा रे
भाग्यवान ते जवान सगळे
हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले
मान राखला मातृभूमीचा रे
इतिहासाच्या पानोपानी
बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून
पराक्रमाचे गीत गाउया रे
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
ललकार | - | चढा स्वर / गर्जना. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.