यमपाश गळ्याशीं ज्यास
यमपाश, गळ्याशीं ज्यास लागला,
त्यास मला कां देतां? ।
कां मांस विकुनि, धर्मास वांकडे जातां? ।
पाळिलें, घातलें खाया, अजवरी ।
बकरीस मोल बहु याया, ज्या परी ।
ही तुमचि मुलीवर माया, कां खरी? ।
जगतांत, सदय सकळांत माउली तात, मुलीला असतां ।
मग तुम्हीच इतके कठोर कां गे होतां? ॥
त्यास मला कां देतां? ।
कां मांस विकुनि, धर्मास वांकडे जातां? ।
पाळिलें, घातलें खाया, अजवरी ।
बकरीस मोल बहु याया, ज्या परी ।
ही तुमचि मुलीवर माया, कां खरी? ।
जगतांत, सदय सकळांत माउली तात, मुलीला असतां ।
मग तुम्हीच इतके कठोर कां गे होतां? ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | गो. ब. देवल |
स्वर | - | |
नाटक | - | शारदा |
चाल | - | मम गौरीही कूपि न मी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.