या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या
पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या
दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या
जाता तया महाला, 'मज्जाव' शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
अम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ति तुझी रहावी, या झोपडीत माझ्या
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या
पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या
दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या
जाता तया महाला, 'मज्जाव' शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
अम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
'तुकड्या' मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ति तुझी रहावी, या झोपडीत माझ्या
गीत | - | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज |
संगीत | - | |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
मति | - | बुद्धी / विचार. |
शामदान | - | चिरागदान, मेणबत्ती ठेवायची ठाणवी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.