या उदास कवितेवरती
या उदास कवितेवरती बघ श्वास तरंगत होता
मग दिशा कुसुंबी झाल्या अन् प्राण कलंडत होता
हलकेच उडाली धूळ, शपथेला रंगही हळवा
मी वळून पाहिले तेव्हा नुसताच लहरला मरवा
या निळसर वातावरणी तो नुसता स्फुंदत होता
हे रान गर्द भवताली, डोहात सावल्या जमल्या
गावात नव्या दु:खाच्या, स्वप्नात कशाला रमल्या
वार्यावर सोडुनी वचने सहवास भणंगत होता
हा नुसता कागद कोरा, तू नजर टाकुनी जा ना
क्षितिजावर उमटे तारा तो तुझाच एक बहाणा
माझ्याच मनाच्या पदरी हलकेच विहंगत होता
मग दिशा कुसुंबी झाल्या अन् प्राण कलंडत होता
हलकेच उडाली धूळ, शपथेला रंगही हळवा
मी वळून पाहिले तेव्हा नुसताच लहरला मरवा
या निळसर वातावरणी तो नुसता स्फुंदत होता
हे रान गर्द भवताली, डोहात सावल्या जमल्या
गावात नव्या दु:खाच्या, स्वप्नात कशाला रमल्या
वार्यावर सोडुनी वचने सहवास भणंगत होता
हा नुसता कागद कोरा, तू नजर टाकुनी जा ना
क्षितिजावर उमटे तारा तो तुझाच एक बहाणा
माझ्याच मनाच्या पदरी हलकेच विहंगत होता
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत |
कुसुंबी | - | कुसुंबाच्या (करडईचे फूल) रंगाचे. |
मरवा | - | सुगंधी पाने असलेली एक वनस्पती. |
विहंग | - | विहग, पक्षी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.