A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विश्वनाट्य सूत्रधार

विश्वनाट्य सूत्रधार
तूंच श्यामसुंदरा
चातुरी तुझी अगाध
कमलनयन श्रीधरा

सुईदोरा नसुनी करी
रात्रीच्या घन तिमिरी
कशिदा तू काढतोस
गगन-पटी साजिरा

मधुबिंदू मधुकरांस
मेघबिंदू चातकास
ज्यास-त्यास इष्ट तेच
पुरविसी रमावरा

कुंचला न तव करांत
तरीही तूच रंगनाथ
अमित रंग अर्पितोस
जगत रंगमंदिरा