A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनि घेतले निज रथी मी तुला

स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासांतला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनि तू घेतला

जाग धुंदीतुनी मजसि ये जेधवा
कवळुनी तुजसि मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला