हा सागरी किनारा
हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
मी कालचीच भोळी
मी आज तीच येडी
ही भेट येगळी का
न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी? वळखून घे इशारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
होते अजाणता मी
ते छेडले तराणे
स्विकारल्या सुरांचे
आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
बोलू मुकेपणाने
होकार ओठ देती
नाती तनामनांची
ही एकरूप होती
एकान्त नाचतो हा फुलवूनिया पिसारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
मी कालचीच भोळी
मी आज तीच येडी
ही भेट येगळी का
न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी? वळखून घे इशारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
होते अजाणता मी
ते छेडले तराणे
स्विकारल्या सुरांचे
आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा
बोलू मुकेपणाने
होकार ओठ देती
नाती तनामनांची
ही एकरूप होती
एकान्त नाचतो हा फुलवूनिया पिसारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर |
चित्रपट | - | मुंबईचा फौजदार |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.