A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयजयजी बजरंग

जयजयजी बजरंग
कपिवर श्री हनुमंता
नामस्मरणे दासा
होसी जय दाता

उचलिलासी द्रोणाचल
लंघिलेस जलधी-जल
घेऊनिया वानरदल
मर्दिलेस राक्षसकुल
दशकंठा हातुनिया
सोडविली सीता

रामदूत हे महान
जितेंद्रिय बुद्धिमान
अतुल तेज अंजनेय
तूच पूज्य तूच ध्येय
सर्व सौख्य लाभ होय
तुजसी पूजिता
अंजनी - मारुतीची आई.
कपी - वानर.
जलधी - समुद्र.
लंघणे (उल्लंघणे) - ओलांडणे, पार करणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पं. राम मराठे, मीना जोशी