A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कितीतरी दिवसांनी आज

कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस !
रंगीबेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास !

आज बर्‍याच दिसांनी झाले मोकळे आभाळ !
दूर तरळे ढगांची शुभ्र मुलायम माळ !

किती दिसांनी पडले ऊन्ह पिवळे धमक,
किरणांच्या वर्षावात न्हाते सावळी सडक !

आणि पाहता सहज जरा मान वळवून,
कैफ जुनाच दाटला माझ्या नसांनसांतून

तोच मोहक चेहरा, त्याच गोड खळ्या गाली,
"आले भरून आभाळ पुन्हा वीज चमकली !"
गीत - सुरेश भट
संगीत - नरेंद्र भिडे
स्वर- राजेश दातार
गीत प्रकार - ऋतू बरवा, भावगीत
  
टीप -
• पुणे आकाशवाणी नभोमालिका 'आनंदलोक' मधील पद.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.