विनायका हो सिद्धगणेशा
विनायका हो सिद्धगणेशा !
रंग सभेला या तुम्ही या
पक्षी गाती घरट्यांमधुनी
आशीर्वच हो द्या तुम्ही द्या
नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु-तोमर
नाग कटिला बांधुन या
अपराधाला घाला पोटी
तुमच्यामाझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटीगाठी
काव्यसुधा ही प्राशुन ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या
आम्ही बालक तव गुण गायक
कृपावंत हो प्रभु गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊन या
रंग सभेला या तुम्ही या
पक्षी गाती घरट्यांमधुनी
आशीर्वच हो द्या तुम्ही द्या
नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु-तोमर
नाग कटिला बांधुन या
अपराधाला घाला पोटी
तुमच्यामाझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटीगाठी
काव्यसुधा ही प्राशुन ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या
आम्ही बालक तव गुण गायक
कृपावंत हो प्रभु गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊन या
गीत | - | अशोक जी. परांजपे |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | रामदास कामत |
नाटक | - | दार उघड बया दार |
राग | - | ललत |
गीत प्रकार | - | प्रथम तुला वंदितो, नाट्यसंगीत |
कटि | - | कंबर. |
तोमर | - | घुसळण्याच्या रवीसारखे लोखंडाचे एक शस्त्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.