आवडला मज मनापासुनी
आवडला मज मनापासुनी गडी तो घोड्यावरचा
कराडचा की कोल्हापूरचा, दिसला मोठ्या घरचा
ऐन विसाची असेल उमर, दिसे वाईसा मोठा
तंग मलमली कुडता अंगी, डोईस हिरवा फेटा
घोड्यावरची मांड पहाता जोर उमगला वरचा
मान उचलुनी वर बघवेना नजर कहारी भारी
नजरानजरी चुकुन होता, उगीच हसली स्वारी
बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा
नाव न पुशिलं गाव न पुशिलं, झाली न बोलाचाली
घडू नये ते घडलं बाई, खूण राहिली गाली
दिवसारात्री तसाच दिसतो हले न डोळ्यापुढचा
कराडचा की कोल्हापूरचा, दिसला मोठ्या घरचा
ऐन विसाची असेल उमर, दिसे वाईसा मोठा
तंग मलमली कुडता अंगी, डोईस हिरवा फेटा
घोड्यावरची मांड पहाता जोर उमगला वरचा
मान उचलुनी वर बघवेना नजर कहारी भारी
नजरानजरी चुकुन होता, उगीच हसली स्वारी
बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा
नाव न पुशिलं गाव न पुशिलं, झाली न बोलाचाली
घडू नये ते घडलं बाई, खूण राहिली गाली
दिवसारात्री तसाच दिसतो हले न डोळ्यापुढचा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके, आशा भोसले |
चित्रपट | - | धरतीची लेकरं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
शिनवे | - | (भाषातज्ज्ञ डॉ. सयाजीराव मोकाशी यांचे या माहितीसाठी आभार.)px>शिनवा अथवा शिनं हा माणदेशी शब्द आहे. याचा अर्थ जोड किंवा जोडी जमणे. जेव्हा एका उंचीच्या, एका वयाच्या बैलांची जोडी जमते त्यास शिनंची जोडी असं म्हणतात. अशा बैलजोडीवर भार आणि ओढ समान वितरीत होतं. (भाषातज्ज्ञ डॉ. सयाजीराव मोकाशी यांचे या माहितीसाठी आभार.) |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.