वेळ झाली भर माध्यान्ह
वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊं कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला
तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतिच्या फुला
वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुतें
चित्त इथें मम हळहळतें, माझ्या प्रीतिच्या फुला
माझी छाया माझ्याखालीं, तुजसाठीं आसावली
कशी करूं तुज सावली, माझ्या प्रीतिच्या फुला
दाटे दोन्ही डोळां पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसें घालुं तुज आणुनी, माझ्या प्रीतिच्या फुला
मृगजळाच्या तरंगांत, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगूं सारंगांत, माझ्या प्रीतिच्या फुला

गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | उषा मंगेशकर |
राग | - | खमाज |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- ३० सप्टेंबर १९२३. |
मृगजळ | - | आभास. |
सारंग | - | नावाडी / चित्रविचित्र रंगाचा / आंब्याचे जाळे / गायनातील एक राग. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.