A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विठु माझा लेंकुरवाळा

विठु माझा लेंकुरवाळा । संगें गोपाळांचा मेळा ॥१॥

निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥२॥

पुढें चाले ज्ञानेश्वर । मागें मुक्ताबाई सुंदर ॥३॥

गोराकुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥

वंका कडेवरी । नामा करांगुळी धरी ॥५॥

जनी ह्मणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥