A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उठा राष्ट्रवीर हो

उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारूया खडे
एकसंघ होउनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होउनी धरू मुठीत भास्करा
होउनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊया, समर्थ होऊया चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्त वीर तो फिरून आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
Random song suggestion