ऊठ पांडुरंगा आता
विश्व माणसांनी भरले तुला नाही जागा
ऊठ पांडुरंगा आता ऊठ पांडुरंगा
राम-कृष्ण दैवत होते इथे पुण्यवान
पंचकन्यकांनी दिधले सतीचेच वाण
त्याच दिव्य संस्काराचा तुटे आज धागा
पुरुष होय बाईलवेडा, राज्य बायकांचे
पुत्र आणि कन्या यांना बंध ना कुणाचे
घरोघरी संसाराचा दिसे नाच नंगा
ऋषीमुनी झाले येथे, साधुसंत झाले
देव धर्म नीती गेली, कलियुग आले
कुणीतरी माणुसकीचा मंत्र एक सांगा
ऊठ पांडुरंगा आता ऊठ पांडुरंगा
राम-कृष्ण दैवत होते इथे पुण्यवान
पंचकन्यकांनी दिधले सतीचेच वाण
त्याच दिव्य संस्काराचा तुटे आज धागा
पुरुष होय बाईलवेडा, राज्य बायकांचे
पुत्र आणि कन्या यांना बंध ना कुणाचे
घरोघरी संसाराचा दिसे नाच नंगा
ऋषीमुनी झाले येथे, साधुसंत झाले
देव धर्म नीती गेली, कलियुग आले
कुणीतरी माणुसकीचा मंत्र एक सांगा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | दाम करी काम |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.