A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उजळित जग मंगलमय

उजळित जग मंगलमय अरुणबिंब आलें
सोनेरी किरणांनीं भू-मंडळ न्हालें

नलिनी-दल-आलिंगन
त्यजुनि भृंग करि गुंजन
कुंज कुंज मोहरले वन-विहंग बोले

रविराया पूजाया
काय फुलें हो‍ऊनियां
गगनीचे तारा-गण धरणीवर आले?
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
कुंज - वेलींचा मांडव.
नलिनी - कमळ.
विहंग - विहग, पक्षी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.