नको मेनका नको उर्वशी
नको मेनका, नको उर्वशी, नको अप्सरा कुणी
मदिरेहुनही धुंद अशी ती मला हवी पद्मिनी
तिचे असावे सुंदर डोळे
केस रेशमी काळे-काळे
हृदयामधले भाव दिसावे नेत्रांच्या दर्पणी
हवे गुलाबी गाल बोलके
अमृत भरले अधर लाडके
तिच्या सारखी तीच असावी प्रणयधुंद कामिनी
मदिरेहुनही धुंद अशी ती मला हवी पद्मिनी
तिचे असावे सुंदर डोळे
केस रेशमी काळे-काळे
हृदयामधले भाव दिसावे नेत्रांच्या दर्पणी
हवे गुलाबी गाल बोलके
अमृत भरले अधर लाडके
तिच्या सारखी तीच असावी प्रणयधुंद कामिनी
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | शांतता ! खून झाला आहे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
पद्मिनी | - | कमळीण, कमळयुक्त तळे / स्त्रियांच्या चार जातींपैकी प्रथम आणि सर्वोत्तम जात / स्त्रियांचे एक नाव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.