उजाडल्यावरी सख्या निघून
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू?
पुन्हापुन्हा मिठीतही शहारतोस काय तू?
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे?
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे?
अजून थांब, लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुलामला विचारुनी फुटेल आज तांबडे
अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू?
पुन्हापुन्हा मिठीतही शहारतोस काय तू?
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे?
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे?
अजून थांब, लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुलामला विचारुनी फुटेल आज तांबडे
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
कुंतल | - | केस. |
तांबडे फुटणे | - | पहाट / सूर्योदय. |
मरंद (मकरंद) | - | फुलातील मध. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.