A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दहावी फ

टक्का, पट्टू, विकीची- दहावी फ, दहावी फ !
सिद्ध्या, बंड्या, नार्‍याची, हर्‍याची- दहावी फ !
काळ्याची दहावी फ तशी बाळ्याची- दहावी फ !
निळ्याची दहावी फ तशी गोळ्याची- दहावी फ !
दहावी फ, दहावी फ !

भिंतींवरल्या चित्रांनी नटलेली- दहावी फ !
बाकांवरती कोरलेल्या नावांची- दहावी फ !
काचा गेल्या, बोडक्या झाल्या खिडक्यांची- दहावी फ !
गुपचूप लपल्या कोंबड्यामध्ये- दहावी फ !
दहावी फ, दहावी फ !

मनगटातल्या जोराची- दहावी फ, दहावी फ !
कधी सांगा, केंव्हाही सांगा, तयार- दहावी फ !
अडल्या-नडल्या टाकून पडल्या कामांची- दहावी फ !
गाणारी दहावी फ, हाणामारीची- दहावी फ !
दहावी फ, दहावी फ !

झाडे लावा, खड्डे खोदा- दहावी फ, दहावी फ !
पंधरा ऑगस्ट, शाळा सजवा- दहावी फ, दहावी फ !
मांडव घाला, कापड काढा- दहावी फ, दहावी फ !
कवायतीला ढोल बडवा- दहावी फ, दहावी फ !
दहावी फ, दहावी फ !
गीत -
संगीत - श्रीरंग उमराणी
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
चित्रपट - दहावी फ
गीत प्रकार - चित्रगीत, बालगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.