A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उघडा दार घराचे

उघडा दार घराचे, उघडा दार मनाचे
आत्मारामा जागे करुनी काम करा रे पुण्याचे

अंधाराचा चोर पकडण्या सूर्य-शिपाई आला
माणसातला चोर कशाने दिवस-उजेडी भ्याला
मुक्ती अशाने मिळते का रे रांजण भरता पापाचे

काल रात्री तू पाप माणसा असशिल काही केले
वेळ असे ही अनुतापाची पातक जाई धुतले
सोनसकाळी कामा लागून सोने कर तू जन्माचे

नफा आणखी तोटा यांचे गणित चालते जेथे
मंदिर कसले दुकान हे तर ढोंग विक्रीला येथे
हृदय शोधुनी पाही वेड्या आसन ते रे देवाचे