उघड दार उघड दार
उघड दार उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार
मध्यरात्रिंच्या नभांत
शांत चांदणें खुलें
पांघरुनी रश्मिजाल
गाढ झोपलीं फुले
गाढ झोपलीं फुले
अजून हा निजे न भृंग
मरंद गुंगिनें भुलून
मंजु गुंजनांत दंग
अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाहि उजळल्या
मध्यरात्रिंच्या निळ्यांत
उघड उघड पाकळ्या
उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार
मध्यरात्रिंच्या नभांत
शांत चांदणें खुलें
पांघरुनी रश्मिजाल
गाढ झोपलीं फुले
गाढ झोपलीं फुले
अजून हा निजे न भृंग
मरंद गुंगिनें भुलून
मंजु गुंजनांत दंग
अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाहि उजळल्या
मध्यरात्रिंच्या निळ्यांत
उघड उघड पाकळ्या
उघड दार
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- डिसेंबर १९३७, नागपूर. |
मरंद (मकरंद) | - | फुलातील मध. |
रश्मी | - | प्रकाश किरण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.