A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उडाला राजहंस गगनात

उडाला राजहंस गगनात
सांगितलेल्या कथा तयांच्या रुणझुणती कानात

अधीर पापण्या उंच उभारून
हंसामागे गेले लोचन
भर दिवसा ये जग अंधारून
जागेपणी मी फिरते बाई कोणा सुखस्वप्‍नात

राजकन्यके सखि दमयंती
बोलतेस तू कुणा संगती
सख्या मैत्रिणी कोणी न दिसती
कसली बाधा तुला झाली येथे उद्यानात

या बाधेचा बोध न झाला
अजुनी माझ्या तरुण मनाला
नकोस सांगू तूही कुणाला
प्रासादाची वाट विसरले ने मजसी सदनात