माझ्या शेतात सोनंच
माझ्या शेतात सोनंच पिकतंय
पानापानात लखलख करतंय
साता समिंदराचं माणिक मोती
देवाच्या हातानं आलं रे खालती
झेललं रे झेललं वरच्या वरती
पिकाच्या डोईवर कणसात भरतंय
कावळ्याच्या डोळ्यागत पाटाचं पाणी
रायाची रंगली मोटंवर लावणी
पांढरिची लक्ष्मी पाजतीया पाणी
मळ्याच्या उरात खळखळ करतंय
पानापानात लखलख करतंय
साता समिंदराचं माणिक मोती
देवाच्या हातानं आलं रे खालती
झेललं रे झेललं वरच्या वरती
पिकाच्या डोईवर कणसात भरतंय
कावळ्याच्या डोळ्यागत पाटाचं पाणी
रायाची रंगली मोटंवर लावणी
पांढरिची लक्ष्मी पाजतीया पाणी
मळ्याच्या उरात खळखळ करतंय
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | लता मंगेशकर, सी. रामचंद्र |
चित्रपट | - | राम राम पाव्हणं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
मोट | - | विहिरीतून पाणी काढण्याचे मोठे पात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.