उभवू उंच निशाण
उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !
हीन-दीन जे, दलित-गलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !
अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगि थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतीचे मूर्तिमंत आव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्
शूर शिपाई आम्ही त्यांचे, व्यर्थ न ते बलिदान
ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकुनी राज्य महान
पुसुनि आसवे मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे हे ममतेचे, गांधीजींचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण

गीत | - | वि. स. खांडेकर |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
चित्रपट | - | माणसाला पंख असतात |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
धीमान् (धी) | - | बुद्धीमान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.