त्या फुलांच्या गंध-कोषी
त्या फुलांच्या गंध-कोषी सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी होउनीया गीत का-
गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का?
मानवांच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
जीवनी संजीवनी तू माउलीचे दूध का?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रांत का?
मूर्त तू मानव्य का रे? बालकांचे हास्य का?
या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी होउनीया गीत का-
गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का?
मानवांच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
जीवनी संजीवनी तू माउलीचे दूध का?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रांत का?
मूर्त तू मानव्य का रे? बालकांचे हास्य का?
या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का?
गीत | - | सूर्यकान्त खाण्डेकर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | पं. हृदयनाथ मंगेशकर, वसंत देसाई |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
टीप - • काव्य रचना - ११ ऑगस्ट १९५५, कोल्हापूर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.