A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्या पैलतिरावर मिळेल मजला

त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा !

इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे
जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे
मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्‍न शीतल वारा !

पलीकडे मनोमय स्वप्‍नांचा संसार !
पलीकडे सुगंधित गीतांचा झंकार !
संतप्त उरास्तव वत्सल अमृतधार !
बहरला मळ्यांनी वैभवपूर्ण किनारा !
गीत - सुरेश भट
संगीत - नरेंद्र भिडे
स्वर- हृषिकेश रानडे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• पुणे आकाशवाणी नभोमालिका 'आनंदलोक' मधील पद.
ध्वस्त - नष्ट केलेले किंवा झालेले.
वत्सल - प्रेमळ.
श्रेय - पुण्य / कल्याण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.