मोट जरा हाक तू जपून
मोट जरा हाक तू जपून ग
विहिरीत धोका लपून ग
खिल्लारी जोडी ही बैलाची मारकी
नाकाला वेसण तोंडाला म्होरकी
सैल नको सोडू ताणून सारखी
ओढणीची दोरी घे खेचून ग
फार नको वाकु तोल तुझा जाईल
डोळं नको झाकु कुणीतरी पाहील
चाक कुरुकुरु गीत तुझं गाईल
दृष्ट नको लावू कुठं चुकून ग
पिकलाय मळा, मोर झाला खुळा
हिरव्या राईत घुमतोय गळा
दिवसानं केला वाकडा डोळा
लाजु नको, हसु नको फसून ग
विहिरीत धोका लपून ग
खिल्लारी जोडी ही बैलाची मारकी
नाकाला वेसण तोंडाला म्होरकी
सैल नको सोडू ताणून सारखी
ओढणीची दोरी घे खेचून ग
फार नको वाकु तोल तुझा जाईल
डोळं नको झाकु कुणीतरी पाहील
चाक कुरुकुरु गीत तुझं गाईल
दृष्ट नको लावू कुठं चुकून ग
पिकलाय मळा, मोर झाला खुळा
हिरव्या राईत घुमतोय गळा
दिवसानं केला वाकडा डोळा
लाजु नको, हसु नको फसून ग
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | ग्यानबा तुकाराम |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
खिल्लारी | - | बैलाची एक जात. |
मोट | - | विहिरीतून पाणी काढण्याचे मोठे पात्र. |
मोरकी | - | मोहरकी, लगाम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.