त्या मदनमनोरमरूपीं
त्या मदनमनोरमरूपीं, मन माझें गुंतुनि गेलें ।
कधिं वाहिन काया त्यासी, प्रेमें ही ऐसें झालें ॥
दिवस तो पूर्ण सौख्याचा, येइल मज कवण्या काळें ! ॥
गुणरूपचिंतनीं पाही । झोंप मज नाहीं ।
शयनिं मी निजलें । किति तरंग हृदयीं उठले ॥
कधिं वाहिन काया त्यासी, प्रेमें ही ऐसें झालें ॥
दिवस तो पूर्ण सौख्याचा, येइल मज कवण्या काळें ! ॥
गुणरूपचिंतनीं पाही । झोंप मज नाहीं ।
शयनिं मी निजलें । किति तरंग हृदयीं उठले ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | गो. ब. देवल |
स्वराविष्कार | - | ∙ कान्होपात्रा किणीकर ∙ मधुवंती दांडेकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | मृच्छकटिक |
चाल | - | उभि जवळ खरी ती |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.