A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी सांगू कसे रे आज मनातील

मी सांगू कसे रे आज मनातील तुजला
तू मधुप होउनी जाणुन घे या कमला

का पाऊल वळले सहज नदीच्या काठी
तरी सुटल्या नाही अजुनी रेशीमगाठी
का अवघडती तव शब्द न कळती मजला

रविरंग उतरले पश्चिम क्षितिजावरती
पाखरे उन्हाची धरतीवरुनी उडती
का हूल मनाची घेऊन वारा सुटला

रे दोन मनांच्या अबोल पडल्या छाया
नवतरंग उठती चारूस्वप्‍न रेखाया
का जळात अवचित जर साडीचा भिजला