A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखये प्रेमपत्र पहिलें

सखये, प्रेमपत्र पहिलें
मखमाली गालावरि लाजत
अधरांनी लिहिलें

अंगांगावरी रंग पसरला
मणिबंधीं फिरफिरुनी पुसला
उपाय माझा पुरता फसला
यौवन रसरसलें

वाचायातें नयनें मिटलीं
तरीही लाजरी हौस न फिटली
जाति न लिखितें पुसतां पुसलीं
अंतरंग कळलें
गीत - राजा बढे
संगीत - व्ही. डी. अंभईकर
स्वर- सुमन माटे
गीत प्रकार - भावगीत
मणिबंध - मनगट.
प्रयोगशील व प्रतिभावंत गायक

श्री. वि. दे. अंभईकर हे एक प्रयोगशील आणि निर्मितीची प्रतिभा असलेले गायक आहेत. गायनकलेची अत्यंत निष्ठेने त्यांनी उपासना केली. ते कलावंत आहेत आणि सामाजिक बांधिलकीची उत्कट जाणीव असलेले देशसेवकही आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचा सहभाग तर होताच, पण आपल्या गायनकलेचा संबंध या लढ्याशी यावा असा स्पृहणीय प्रयत्‍नही त्यांनी केला आहे.
(संपादित)

वि. वा. शिरवाडकर
वेचलेले संगीत मोती (पं. वि. दे. अंभईकर)
शब्दांकन मा. ह. रानडे, कुसुम रानडे
सौजन्य- स्वानंदी प्रकाशन, पुणे

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.