तुह्मी संत मायबाप
तुह्मी संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुह्मां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढावया सुख भक्ति-भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥
तुका ह्मणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुह्मी जगीं संतजन ॥४॥
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुह्मां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढावया सुख भक्ति-भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥
तुका ह्मणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुह्मी जगीं संतजन ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वराविष्कार | - | ∙ सुरेश वाडकर ∙ वसंत आजगांवकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • स्वर- सुरेश वाडकर, संगीत- प्रभाकर पंडित. • स्वर- वसंत अजगांवकर, संगीत- ???. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.