A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुम्हां तो शंकर

तुम्हां तो शंकर सुखकर हो ।
हिमधरस्थित विकट काननिं तप करी
प्रियकरी शुभकरी सुंदरी तिजवरी
भुलत निज कैलासनगिं तो ॥

पद्मजा मुररिपुसही अवमानुनी
इंद्रा चंद्रा सकलां सोडुनी पर्णनीं
कुंदरदनि सुकुंतलावेणी
जाहली शिववरानुसारिणी
पर्वताग्रशिरोमणी अर्पि कन्या सद्गुणी
हर्षनिर्भर करग्रहणीं झाला महादेवास तो ॥
कुंतल - केस.
कुंदरदनि - कुंदकळ्यांसारखे दात असलेली.
कानन - अरण्य, जंगल.
पर्णणे - वरणे / पसंत करणे.
मुर - नरकासुराचा अनुयायी राक्षस. यास कृष्णाने मारले म्हणून त्यास मुरारी हे नाव पडले.
रिपु - शत्रु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  भार्गवराम आचरेकर, पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे