सोबतीस हलके
सोबतीस हलके
सावलीस ऊन
भोवती तशी ही
मोरपीस खूण
दोन काठ अपुले
ऐल आणि पैल
ऐन सांजवेळी
बंध होई सैल
बंधनाविना रे
ही गुंतणारी वीण
हा प्रवास आता
तुझ्यावीण कठीण
वादळात कोणत्याही
हाक दे कधीही
हात देत हाती
मी तिथे असेन
सावलीस ऊन
भोवती तशी ही
मोरपीस खूण
दोन काठ अपुले
ऐल आणि पैल
ऐन सांजवेळी
बंध होई सैल
बंधनाविना रे
ही गुंतणारी वीण
हा प्रवास आता
तुझ्यावीण कठीण
वादळात कोणत्याही
हाक दे कधीही
हात देत हाती
मी तिथे असेन
गीत | - | श्रीपाद अरुण जोशी |
संगीत | - | निलेश मोहरीर |
स्वर | - | मंदार आपटे, विद्या करलगीकर |
गीत प्रकार | - | मालिका गीत, युगुलगीत |
टीप - • मालिका- आई कुठे काय करते !, वाहिनी- स्टार प्रवाह. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.