तुला न कळले मला न कळले
तुला न कळले, मला न कळले
कसे प्रीतिचे धागे जुळले !
ते डोळ्यांचे पहिले मीलन
ते पहिले स्मित, ते संवेदन
शब्दाहुन ते गोड मुकेपण
कसे कळीचे फूल उमलले?
थोडी लज्जा, थोडी भीती
ओढ अनावर, आतुरता ती
कशी जागली हृदयी प्रीती?
कसे मनातुन गीत उजळले?
स्पर्श लाजरा होता पहिला
काळ थांबुनी उभा राहिला
कणाकणातुन वसंत फुलला
कुणी कुणाला कसे जिंकिले?
कसे प्रीतिचे धागे जुळले !
ते डोळ्यांचे पहिले मीलन
ते पहिले स्मित, ते संवेदन
शब्दाहुन ते गोड मुकेपण
कसे कळीचे फूल उमलले?
थोडी लज्जा, थोडी भीती
ओढ अनावर, आतुरता ती
कशी जागली हृदयी प्रीती?
कसे मनातुन गीत उजळले?
स्पर्श लाजरा होता पहिला
काळ थांबुनी उभा राहिला
कणाकणातुन वसंत फुलला
कुणी कुणाला कसे जिंकिले?
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | कलंक शोभा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.