तुझ्याविना
हे चांदणे हर्ष घेऊन आले
कवडसे हवेसे उधळीत आले
घे वेचुनी ते नाही कुणाचे
तुझ्याविना
पहाटेस कळले ही रात्र थकली
त्या चांदण्यांची स्वप्नेही सरली
कहाण्या तयांच्या कुणाला न कळल्या
तुझ्याविना
कवडसे हवेसे उधळीत आले
घे वेचुनी ते नाही कुणाचे
तुझ्याविना
पहाटेस कळले ही रात्र थकली
त्या चांदण्यांची स्वप्नेही सरली
कहाण्या तयांच्या कुणाला न कळल्या
तुझ्याविना
गीत | - | नितीन आखवे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | देवकी पंडित, स्वप्नील बांदोडकर |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- तुझ्याविना, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.