तुझ्या पापण्यांच्या आत
तुझ्या पापण्यांच्या आत काय साठले, दाटले?
दोन ओठांच्या दलांत दंव कोणते गोठले?
उपचाराचे बोलणे मध्ये तुटून थांबले
क्षण अशब्द रिकामे युगाप्रमाणे लांबले
नेत्र मिळाले नेत्रांस, नीट केलेस कुंतल
जरा कापत्या करांनी घेसी ओढून अंचल
गोंधळल्या गालांवरी स्मित उमले अधुरे
शब्द डोकावती काही ओठांमधून घाबरे
उभे संकोचाच्या आड, त्याची दिसली सावली
लाल रंगत उषेची मेघांमध्ये न मावली
नको सांगूस कधीही काय सांगायाचे आहे
अशा भावमोहनाचा अंत अक्षरांत राहे
दोन ओठांच्या दलांत दंव कोणते गोठले?
उपचाराचे बोलणे मध्ये तुटून थांबले
क्षण अशब्द रिकामे युगाप्रमाणे लांबले
नेत्र मिळाले नेत्रांस, नीट केलेस कुंतल
जरा कापत्या करांनी घेसी ओढून अंचल
गोंधळल्या गालांवरी स्मित उमले अधुरे
शब्द डोकावती काही ओठांमधून घाबरे
उभे संकोचाच्या आड, त्याची दिसली सावली
लाल रंगत उषेची मेघांमध्ये न मावली
नको सांगूस कधीही काय सांगायाचे आहे
अशा भावमोहनाचा अंत अक्षरांत राहे
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | श्रीधर फडके |
अल्बम | - | लिलाव |
गीत प्रकार | - | भावगीत |
अंचल | - | पदर, ओचा. |
कुंतल | - | केस. |
रंगत | - | मौज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.