रुतला उरात काटा
रुतला उरात काटा, आल्या जुळून वाटा
बेहोषल्या भावना प्रीतीच्या या
हो वेदना सुखाची, आतुरल्या जीवाची
भारावल्या जगी या नाही तमा कशाची
जाईजुई अंतरी गंधल्या या
चंचल वसंत वारा, खुलवी मनी फुलोरा
मनमोर धुंद नाचे फुलवूनिया पिसारा
गंगा नदी भेटली सागरा या
आली घडी सुखाची, इष्कातल्या नशेची
तिमिरातुनी निशेच्या उजळे प्रभा उषेची
दाही दिशा भासती अप्सरा या
बेहोषल्या भावना प्रीतीच्या या
हो वेदना सुखाची, आतुरल्या जीवाची
भारावल्या जगी या नाही तमा कशाची
जाईजुई अंतरी गंधल्या या
चंचल वसंत वारा, खुलवी मनी फुलोरा
मनमोर धुंद नाचे फुलवूनिया पिसारा
गंगा नदी भेटली सागरा या
आली घडी सुखाची, इष्कातल्या नशेची
तिमिरातुनी निशेच्या उजळे प्रभा उषेची
दाही दिशा भासती अप्सरा या
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | महेंद्र कपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.