A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्यामाझ्यासवे कधी

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

अता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खूणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही