तुझ्या लोचनांची मला
तुझ्या लोचनांची मला दृष्टी यावी
दया-धर्म-मानव्याची तृषा ना शमावी
बोधिसत्त्व सिद्धार्था रे सत्त्वशील व्हावे
मानवास उद्धाराचे द्वार दाखवावे
सुगंधास बंधुत्त्वाच्या पालवी फुटावी
दिशांतून चैतन्याची गीतिका फुलावी
कुठे कोण विश्वामाजी व्यथेने विझाला
प्रेमदीप हृदयी त्याच्या तूच तेवविला
दीन दु:खितांची दु:खे तूच संपवावी
आसवांत भिजली त्यांची कथा तू पुसावी
नव्यानेच बुद्धत्वाला मनी वाढविले
काम-क्रोध-दंभाला मी दूर लोटियेले
तुझ्या चिंतनाने सारी सृष्टी पुण्य व्हावी
बुद्ध-धम्म-संघाला ही कथा शरण यावी
दया-धर्म-मानव्याची तृषा ना शमावी
बोधिसत्त्व सिद्धार्था रे सत्त्वशील व्हावे
मानवास उद्धाराचे द्वार दाखवावे
सुगंधास बंधुत्त्वाच्या पालवी फुटावी
दिशांतून चैतन्याची गीतिका फुलावी
कुठे कोण विश्वामाजी व्यथेने विझाला
प्रेमदीप हृदयी त्याच्या तूच तेवविला
दीन दु:खितांची दु:खे तूच संपवावी
आसवांत भिजली त्यांची कथा तू पुसावी
नव्यानेच बुद्धत्वाला मनी वाढविले
काम-क्रोध-दंभाला मी दूर लोटियेले
तुझ्या चिंतनाने सारी सृष्टी पुण्य व्हावी
बुद्ध-धम्म-संघाला ही कथा शरण यावी
गीत | - | रंगराज लांजेकर |
संगीत | - | प्रभाकर धाकटे |
स्वर | - | वामन धाकटे |
गीत प्रकार | - | भीम गीत / बुद्ध गीत |
धम्म | - | 'धम्म' हा पाली भाषेतील शब्द, 'धर्म' या 'योग्य व न्याय्य मार्ग' या संस्कृत शब्दावरून आला आहे. |
बोधिसत्त्व | - | जी प्रबोधन किंवा परिपूर्ण ज्ञान प्राप्तीच्या, अर्थात 'बुद्धत्त्व' प्राप्तीच्या मार्गावर आहे, अशी व्यक्ती. |
संघ | - | बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.