A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्या कामामधुन तुझ्या

तुझ्या कामामधुन, तुझ्या घामामधुन, उद्या पिकंल सोन्याचं रान
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार, तुला नव्या जागाची आण

तुझ्या घणाच्या घावामधुन
उठे उद्याच्या जगाची आस
तुझ्या घामाच्या थेंबामधुन
पिके भुकेल्या भावाचा घास
तुझ्या ध्यासामधुन, श्वासामधुन, जुळे नव्या जगाचे गान

तुझ्या पोलादी टाचेखालुन
जित्या पाण्याचे निघतील झरे
तुझ्या लोखंडी दंडामधुन
वाहे विजेची ताकद कि रे
चल मारून धडक, उभा फोडू खडक, आता कशाची भूकतहान

भाग्य लिहिलेलं माझं तुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्‍न लपलेलं माझं
तुझं इथं बरड माळावरी
घेउन कुदळखोरं, चला जाऊ म्होरं, देऊ देशाला जीवनदान