तुझी प्रीत आज कशी स्मरू
तुझी प्रीत आज कशी स्मरू?
तुझी प्रीत प्रीत ना राहिली
तुझे गीत गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू?
तुझे शब्द ना ते राहिले
नाते कधीचे संपले
उरली आता शोकांतिका
का शोक त्याचा मी करू?
तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
हाताविना मी त्या कशी
रे तोल माझा सावरू?
तुझी प्रीत प्रीत ना राहिली
तुझे गीत गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू?
तुझे शब्द ना ते राहिले
नाते कधीचे संपले
उरली आता शोकांतिका
का शोक त्याचा मी करू?
तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
हाताविना मी त्या कशी
रे तोल माझा सावरू?
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | अपराध |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.