A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझे रूप सखे गुलजार असे

तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावी पिसे !

ती वीज तुझ्या नजरेमधली
गाली खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगिरी
उरी हसती गुलाबी गेंद कसे !

नखर्‍यात तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफात बुडाले भान असे !

ती धुंद मिठी, बेबंद नशा
श्वासांत सखे विरतात दिशा
बेहोश सुखाच्या या गगनी
मी आज मला हरवून बसे !