A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तूं टाक चिरुनि ही मान

तूं टाक चिरुनि ही मान, नको अनमान ।
न‍उ मास वाहिले उदरिं तिचा धरिं, कांहि तरी अभिमान ॥

तो कसाब झाला तात ।
करूं धजे मुलीचा घात ।
मग बरा तुझा म‍उ हात ।
जा, विसरुनि माया सारी,
करीं घे सुरी, धरीं अवसान ॥

हें कठिण दिसे जरि काज ।
विष तरी जरासें पाज ।
परि ठेवूं नको जगिं आज ।
जी दु:ख मुलीचें निवारिना ती माया नव्हे दुस्मान ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - शारदा
चाल-यहिबंदिमे पाया गं
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
काज - काम.
दुस्मान - दुश्मन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.