A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सख्या हरी जडली प्रीत

सख्या हरी,
जडली प्रीत तुझ्यावरी

गोप-गोपिका जमल्या भवती
धरुनिया फेर गाती, हासती
श्यामल तू, तुझ्या करी मुरली घुमते वनांतरी

मंजुळ रव तव कानी भरले
मंगल मंगल गोकुळ नटले
तुझ्या मनी माझ्या मनी, वसत सखया प्रीत खरी