तूं पाक सूरत कामिना
तूं पाक सूरत कामिना कीं दाही बोटीं मीना हातामध्यें वीणा घेऊनिया गाती
तुला गुणीजन अवघे चहाती
नारी तुझी गजाची ग चाल भांगी गुलाल मुलायस गाल
नवी नवती तूं चंद्रकळा सवती, गायनामध्यें गुणीजन स्तविती
कंबर बारीकशी बुंद मनामधीं कुंद मिजाजींत धुंद खुले तव कांती
तुला गुणीजन अवघे चहाती
नाकीं नथनी ग सर्जेदार फुले अंगी जोहार ग फार
वनीं जणुं हे पळसतरूं फुललें
गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गड्ये अहो फांकडे तुझी चहुंकडे गुणाची हो ख्याती

गीत | - | शाहीर होनाजी-बाळा |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पंडितराव नगरकर |
चित्रपट | - | अमर भूपाळी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
नवती | - | तरुणी / तारुण्य / नवी पालवी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.