विझले रत्नदीप नगरात
विझले रत्नदीप नगरात
आता जागे व्हा यदुनाथ
अंधारातून प्रकाश निवळे
हलके हलके पूर्वा उजळे
दंवबिंदूंचे मोती झाले पर्णांच्या तबकात
जागी झाली सुर्वणनगरी
अरुणासह ये उषासुंदरी
सोन्याची नवप्रभा पसरली सोन्याच्या दारात
आता जागे व्हा यदुनाथ
अंधारातून प्रकाश निवळे
हलके हलके पूर्वा उजळे
दंवबिंदूंचे मोती झाले पर्णांच्या तबकात
जागी झाली सुर्वणनगरी
अरुणासह ये उषासुंदरी
सोन्याची नवप्रभा पसरली सोन्याच्या दारात
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | मालती पांडे |
चित्रपट | - | मायाबाजार (ऊर्फ वत्सलाहरण) |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अरुण | - | तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य. |
उषा | - | पहाट. |
प्रभा | - | तेज / प्रकाश. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.